एकरुखे आरक्षणात 13 पैकी 7 प्रभाग महिलांसाठी राखीव
Featured

एकरुखे आरक्षणात 13 पैकी 7 प्रभाग महिलांसाठी राखीव

Sarvmat Digital

जाहीर झालेल्या आरक्षणास देवेंद्र भवर यांची हरकत

एकरूखे (वार्ताहर) – एकरुखे ग्रामपंचायतच्या सप्टेंबर अथवा ऑगस्ट महिन्यात होणार्‍या निवडणुकीची प्रभागनिहाय सदस्य आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले असल्याची महिती निवडणूक निर्णय अधिकारी डी. आर. शेळके यांनी दिली. या आरक्षणात 13 सदस्यांपैकी 7 महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले. त्यामुळे ग्रामपंचायतच्या राजकारणाच्या पारावर चांगल्याच गप्पा रंगू लागल्याने चित्र पाहायला मिळू लागले आहे. मात्र या आरक्षणाबाबत देवेंद्र भवर यांनी हरकत घेतली आहे.

या ग्रामपंचायतीचे एकूण पाच प्रभाग असून या प्रभागातून 13 सदस्य निवडले जातात. यामध्ये प्रभाग एकमधून दोन, सध्या येथे अनुसूचित जमाती पुरुष व सर्वसाधारण महिलांसाठी राखीव होता. त्यात बदल होऊन तीन जागांसाठी सर्वसाधारण पुरुष, अनुसूचित जमाती महिला व ओबीसी महिलांसाठी राखीव करण्यात आला. प्रभाग दोन मधून दोन सदस्य निवडले जातात. तो सध्या ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला होती. हा प्रभाग आता अनुसूचित जमाती पुरुष, सर्वसाधारण महिला राखीव करण्यात आला आहे. प्रभाग तीनमध्ये तीन सदस्य निवडले गेले.

हा प्रभाग सध्या सर्वसाधारण पुरुष, अनुसूचित जमाती महिला, ओबीसी महिला यासाठी राखीव होता. आता दोन जागेसाठी ओबीसी पुरुष व सर्वसाधारण महिला जागेसाठी राखीव करण्यात आला आहे. प्रभाग चारमध्ये तीन सदस्य असून सध्या ओबीसी पुरुष, सर्वसाधारण पुरुष, सर्वसाधारण महिला असे होते. ते आता अनुसूचित जमाती पुरुष, सर्वसाधारण महिला, ओबीसी महिलासाठी आरक्षित करण्यात आला आहे. प्रभाग पाचमध्ये सध्या दोन जागा असून आदिवासी महिला, ओबीसी महिलेसाठी राखीव होता. आता हा प्रभाग तीन जागंसाठी सर्वसाधारण पुरुष, ओबीसी पुरुष व सर्वसाधारण महिलेसाठी राखीव करण्यात आला आहे.

या आरक्षण निवडीचे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच लता थोरात होत्या. याप्रसंगी बाजार समितीचे संचालक देवेंद्र भवर, जालिंदर गाढवे, जितेंद्र गाढवे, दिलीपराजे सातव, गणेश थोरात, तलाठी स्वाती मेश्राम, ग्रामविकास अधिकारी आर. एस. सूर्यवंशी, सारंगधर गाढवे, भाऊसाहेब गाढवे, दिगंबर सातव, राजाराम थोरात, शिवाजी सातव, अप्पासाहेब गाढवे, गणपत आग्रे, राजेंद्र हिवाळेे, साहेबराव आग्रे, रमेश हारगुडे, बाळासाहेब बावके, जग्गनाथ थोरात, प्रकाश काळे, प्रसाद भवर, गणेश पगारे, रामराव कार्ले, नवनाथ जाधव, बाळासाहेब गाढवे आदींसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. दि. 9 सप्टेंबर रोजी रोजी ग्रामपंचायतीचा कार्यकाल पूर्ण होत आहे.

या आरक्षणाबाबत देवेंद्र भवर यांनी हरकत घेतली असून ज्या प्रभागामध्ये ज्या समाजाची लोकसंख्या अधिक असेल तिथे त्या समाजाला न्याय मिळायला पाहिजे. तसेच त्या समाजाला प्रतिनिधी मिळाले पाहिजे. प्रभाग पाचमध्ये अनुसूचित जमाती लोकसंख्या अधिक असतानाही ओबीसी आरक्षण पडले तर प्रभाग दोनमध्ये ओबीसीची संख्या अधिक असताना अनुसूचित जमातीचे आरक्षण पडले. याबाबत आपण कायदेशीर मार्गाने हरकत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले . 13 जागांपैैकी सात जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. सरपंच पदाचे आरक्षण काही कालावधीत निघणार आहे.

ग्रामपंचायत वार्डचे जे आरक्षण काढले ते पूर्णतः चुकीचे आहे. आरक्षणाची रचना करताना गावातील पुढार्‍यांना तलाठ़ी्यांनी बोलावून त्यांची मते अजमावली होती. परंतु त्या वॉर्डातील जनगणनेनुसार कोणतीही रचना करण्यात आली नाही. यात केवळ तलाठी कार्यालय जबाबदार आहे. मात्र तहसीलदारांनी समक्ष पाहणी करून यात हस्तक्षेप करून ग्रामस्थांना न्याय द्यावा. जातीनिहाय आरक्षण असावे, असे दिलीप सातव यांनी म्हटले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com