चालकाला मारहाण करून डंपर पळविला
Featured

चालकाला मारहाण करून डंपर पळविला

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी ) – डंपरवरील चालकाला चौघांनी चाकूचा धाक दाखवून मारहाण केली. मारहाण करून चालकाच्या ताब्यातील आठ लाख रूपये किंमतीचा डंपर (क्र. एमएच- 14 सीके- 4837), 21 हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 15) पहाटे चार ते साडेचारच्या दरम्यान खोसपूरी शिवारात घडली.

याप्रकरणी चालक मोहम्मद याकूब अब्दुल कादीर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com