महामानव डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांना अभिवादन
Featured

महामानव डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी) –  भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात आले. कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय, सामाजिक क्षेत्रातील विविध व्यक्तींनी गर्दी टाळून घरातच डॉ. आंबेडकर यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण केले.

राज्याचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी मंत्रालयात डॉ. आंबेडकर यांना पुष्पांजली अर्पण करत अभिवादन केले. तर आ. सुधीर तांबे यांनी त्यांच्या संगमनेरमधील निवासस्थानी महामानव डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन केले. यावेळी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, डॉ. सौ. मैथिली तांबे, प्रा. बाबा खरात व अहिल्या तांबे आदी उपस्थित होते. पद्श्री डॉ. विखे पाटील सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यस्थळावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रवरा परिवाराच्या वतीने अभिवादन केले. त्याच सोबत खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी महामानवला अभिवादन केले. नगरमध्ये शिवसेना माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक दता कावरे, वसंत शितोळे, गणेश दहीहंडे, विष्णू थोरात, शेखर आढाव, प्रकाश थोरात, अभिजित कारखिले, सागर थोरात, रोनक मुथा, आकाश हुच्चे यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. प्रशासनाच्या आवाहनानुसार घरात राहून गर्दी न करता साध्यापद्धतीने जयंती साजरी करण्यात आली.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाप्रमाणे घरच्या घरी सागर भिंगारदिवे यांनी परिवारासह अभिवादन केले. तर मंगलगेट येथे डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करून परिसरातील नागरिकांना पुरीभाजी वाटप करण्यात आली. यावेळी नगरसेवक सचिन जाधव समवेत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सुनील क्षेत्र, प्रवीण ठोंबे, बाळासाहेब भिंगारदिवे, अनिकेत शिंदे आदी उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com