जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत गणराज म्हसे प्रथम
Featured

जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत गणराज म्हसे प्रथम

Sarvmat Digital

वाकडी (वार्ताहर)- अतिशय बिकट परीस्थितीतून शिक्षण घेत असलेल्या तसेच आपल्या स्वच्छ अक्षराने संपूर्ण जनमाणसांना भुरळ घालणार्‍या राहाता तालुक्यातील वाकडी येथील गणराज राजेंद्रकुमार म्हसे याने जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. यामुळे गणराजचे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे.

जिल्हा परिषद वाकडी केंद्र शाळेतील गणराज म्हसे या चौथीत शिकणार्‍या विद्यार्थ्याच्या कुटुंबाची परिस्थिती जेमतेमच आहे. आई वनिता हिच्या मजुरीवरच कुटुंबाचा उदार निर्वाह चालतो. वडील अर्धांगवायूने पीडित आहे. कुठलीही भक्कम साथ नसताना देखील गणराज म्हसे हा विद्यार्थी हाताच्या कलेने मात्र संपूर्ण जगाला वेड लावले आहे. तीन वर्षांपासून सलग सराव करत सुरुवातीला केंद्रात, त्यानंतर तालुक्यात व आता जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकवला आहे.

वर्गशिक्षक बनसोडे यांनी व्यवस्थित सराव करून घेत सुरुवातीला गणराजचे हस्ताक्षर थोडे वाकडे होते. पण 3 वर्षांच्या सरावानंतर त्याच्या हस्ताक्षरामध्ये मोठा बदल झाला. म्हणून तो जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळू शकला. गणराजचे वडिल राजेंद्रकुमार म्हसे,आई वनीता म्हसे, आजी यांच्याबरोबर मार्गदर्शक म्हणून गणराजचे काका मावशी तसेच केंद्रप्रमुख श्री. गमे, गणराजचे शिक्षक श्री. बनसोडे, मुख्याध्यापक श्री. नाडेकर आदींचे गणराजला मार्गदर्शन मिळाले.

गणराजचे वडील अर्धांगवायुमुळे घरी पडून आहेत. गणराजची आई शेजारी असलेल्या श्रीरामपूर एमआयडीसीमध्ये मजुरीला जाते. यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदारनिर्वाह चालतो. घरात एकूण चार सदस्य असून गणराजला छोटी बहीण आहे. गणराजच्या घरची परीस्थिती अतिशय बिकट असल्यामुळे गणराजच्या कलागुणांना वाव मिळवण्याकरिता तसेच त्याला पुढील शिक्षणाकरिता शासनस्तरावरून मदत व्हावी, अशी मागणी शिक्षकप्रेमी नागरिक करत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com