जिल्हा रुग्णालयातून पळालेले कोरोना संशयित माय-लेक पुन्हा दाखल

जिल्हा रुग्णालयातून पळालेले कोरोना संशयित माय-लेक पुन्हा दाखल

जिल्हा रुग्णालयातून पळालेले कोरोना संशयित माय-लेक पुन्हा दाखल

कर्जत (प्रतिनिधी) – तालुक्यातील बेलगाव येथील माय-लेकास संशयित म्हणून नगर येथील जिल्हा रुग्णालयामध्ये तपासणीसाठी पाठवले होते. परंतु, ते परत गावी आल्यामुळे गावातील संतप्त नागरिकांनी त्यांना घरातच थांबून ठेवले. याबाबतची माहिती पोलीस व आरोग्य विभागाला देण्यात आली व त्यांना पुन्हा जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

बेलगाव मधील एका व्यक्तीला सोमवारी खोकल्याचा त्रास होऊ लागला. यामुळे त्याच्यासोबत त्याची वृद्ध आई अशा दोघांना तालुका आरोग्य अधिकारी यांनी जिल्हा रुग्णालयामध्ये तपासणीसाठी पाठवले होते. त्यांचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविले. दरम्यान, आज सकाळी जिल्हा रुग्णालयांमधून ते दोघेजण बेलगाव येथे परत आले. ते परत आल्याचे ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थ संतप्त झाले.

माय-लेक जिल्हा रुग्णालयात पळून आले आहेत, अशी माहिती ग्रामस्थांनी पोलिस व आरोग्य विभागाला दिली. त्यानंतर पोलिस व आरोग्य अधिकारी बेलगाव मध्ये आले व त्या दोघांना पुन्हा जिल्हा रुग्णालय मध्ये घेऊन गेले आहेत. यासंदर्भात तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पुंड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित घटनेला दुजोरा दिला. तसेच, त्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली नसल्याचे सांगितले. त्याला फक्त टीबी सदृश्य आजाराच्या सारख्या खोकल्याचा त्रास होत आहे. परंतु गावातील वातावरण पाहून आम्ही त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवले आहे असे पुंड यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com