Friday, April 26, 2024
Homeनगरजिल्ह्यात येणार्‍या-जाणार्‍यांसाठी प्रशासनाची अडथळ्याची शर्यत

जिल्ह्यात येणार्‍या-जाणार्‍यांसाठी प्रशासनाची अडथळ्याची शर्यत

माहिती देणे सोडा, महसूलच्या नोडल अधिकार्‍यांकडून उचला जात नाही मोबाईल

अहमदनगर (प्रतिनिधी)- लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात व राज्यामधील इतर जिल्ह्यामध्ये अथवा इतर राज्यामध्ये अडकलेल्या स्थलांतरीत मजूर, पर्यटक, भाविक, विद्यार्थी व इतर व्यक्तींना त्यांचे वास्तव्याच्या मुळ ठिकाणी परतण्यासाठी राज्य सरकारने आदर्श कार्यपध्दती निश्चित केली आहे.

- Advertisement -

या आदर्श कार्यपध्दतीसाठी महसूल विभागाने नेमलेल्या अधिकार्‍यांकडून मोबाईलच उचलले जात नसल्याने कोणाकडे मार्गदर्शन घ्यावे, यावरून अनेकजण शनिवारी त्रस्त होते. दरम्यान, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी दिवसभरात शेकडो जणांचे कॉल करत असताना महसूलचे अन्य अधिकारी फोनच उचलत नसतील तर त्यांची नेमणूक कशासाठी केली असा सवाल नागरिकांमधून उपस्थित करण्यात येत आहे.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना कोणतीही अडचण आल्यास त्यांच्या मदतीसाठी जिल्ह्यात पदसिध्द नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये बाहेरुन येणार्‍या व्यक्तींसाठी नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (निवडणूक) यांची तर जिल्हयातून बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जाणार्‍या व्यक्तींसाठी नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (महसूल) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यात पथक क्रमांक एकमध्ये जिल्ह्यामध्ये बाहेरुन येणार्‍या व्यक्तींसाठी- नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (निवडणूक) (मो.9763739974), सहाय्यक नोडल अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन शाखेचे तहसीलदार महेश पवार (मो. 8956799922), करमणूक कर शाखा नायब तहसीलदार सुनिल पाखरे (मो. 9309881788) व पुनर्वसन शाखा अव्वल कारकून अमोल झोटींग (मो. 9922426717), कुळकायदा शाखा अव्वल कारकून शेखर साळुंके (मो.9881119866)आणि सं.गा.यो. शाखा लिपीक भगवान सानप (मो.9130836918) असे अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहेत.

पथक क्रमांक दोनमध्ये जिल्ह्यातून बाहेरच्या जिल्हयामध्ये जाणार्‍या व्यक्तींसाठी नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (महसूल) (मो.9130799939), सहाय्यक नोडल अधिकारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील (मो.7020739411), राज्य परिवहन मंडळाचे विभागीय नियंत्रक विजय गिते (मो.9403709123), निवडणूक तहसीलदार चंद्रशेखर शितोळे (मो.9881304874) गृह शाखा नायब तहसीलदार राजू दिवाण (मो.9890929510) व निवडणूक शाखा अव्वल कारकून राजेंद्र शिंदे (मो. 7588543715), करमणूक कर शाखा अव्वल कारकून संदेश दिवटे (मो.7020945296) आणि ग्रामपंचायत शाखा लिपीक प्रवीण कांबळे (मो.7020360085) असे अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहेत.

यात नेमणूक करण्यात आलेले प्रमुख अधिकार्‍यांना येणार्‍या अडचणीसंदर्भात शनिवारी मोबाईलवर संपर्क करण्यात आला असता, एकतर ते बंद, कार्यक्षेत्राच्या बाहेर अथवा रिंग गेल्यानंतर ते संबंधितांना उचलेलच नाहीत. दुसरीकडे जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी मोबाईल उचला गेला नाहीत, ते स्वत: पुन्हा संबंधित व्यक्तीला मोबाईलवर संपर्क करून त्याची विचारपूस करतात. मात्र, त्यांच्या खात्यातील अधिकारी हे जनतेच्या प्रश्नाकडे कानाडोळा करत असल्याचे चित्र आहे.

मंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी
जिल्ह्यात जिल्हाधिकारी द्विवेदी वगळता महसूल विभागातील बोटावर मोजण्याऐवढे अधिकारी जनतेच्या प्रश्नावर अग्रेसर दिसत आहेत. अन्य अधिकार्‍यांना नेमून दिलेल्या कामासाठी ते कार्यालयीन वेळेत मोबाईल उचलत नाही, या सर्वांकडे महसूलमंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यात हा प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या