डिझेल टँकर रोडवरच आडवा
Featured

डिझेल टँकर रोडवरच आडवा

Sarvmat Digital

222 हायवेवरील घटना । सुदैवाने अघटित टळले

अहमदनगर (प्रतिनिधी) – चालकाचे नियंत्रण सुटल्याने डिझेल घेऊन जाणारा टँकर रस्त्यावर पलटी झाल्याने वाहतूक काही काळ बंद झाली. पोलिसांनी क्रेनच्या मदतीने टँकर बाजुला केल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली. सुदैवाने अघटित घटना टळली.

आज मंगळवारी भल्या सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही नगर-पाथर्डी हायवेवर मेहेकरी गावातील वळणावर ही घटना घडली. टँकर (एमएच 05, एएम 1552) रिलायन्स कंपनीचे डिझेल घेऊन मुबंईहून निघाला होता. 222 हायवेने तो परभणीकडे जात असताना मेहेकरी गावाच्या वळणावर अचानक पलटी झाला. चालक महादेव प्रल्हाद चौधरी (रा.पिंपरी,जि.जालना) याचे नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली.

डिझेलचा टँकर पलटी झाल्याने गावकर्‍यांची झोप उडाली. मात्र सुदैवाने अघटित घडना टळली. टँकर रस्त्यावर आडवा झाल्याने वाहतूक पूर्णत: ठप्प झाली. नगर तालुका पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पथक घटनास्थळीकडे रवाना झाले. पोलिसांनी क्रेन मागवून रस्त्यावर आडवा झालेला टँकर बाजुला करण्यात आला. अपघातात कोणीही जखमी झाले नाही. पावणेदोन तास वाहतूक ठप्प झाली होती.

Deshdoot
www.deshdoot.com