कोरोना : श्री क्षेत्र देवगडची सर्व मंदिरे बंद
Featured

कोरोना : श्री क्षेत्र देवगडची सर्व मंदिरे बंद

Sarvmat Digital

देवगडफाटा (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथील सर्व मंदिरांचे प्रवेश कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून बंद करण्यात आले आहेत.

याबाबत देवस्थानाने पत्रक प्रसिद्ध केले असून त्यात भाविकांना आवाहन करण्यात आले आहे. संस्थान प्रशासनाने नियोजित पुण्यतिथी कार्यक्रम पूर्णतः रद्द केला आहे. तसेच संस्थानचे भक्तनिवास, प्रसादालय, उपहारगृहे, इतर दुकाने तसेच मंदिर प्रवेश पुढील प्रशासकीय आदेशापर्यंत बंद ठेवली जाणार आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com