संगमनेरचे नायब तहसिलदार करोना बाधीत

संगमनेरचे नायब तहसिलदार करोना बाधीत

संगमनेर (प्रतिनिधी) – संगमनेर तहसिल येथे कार्यरत असलेले नायब तहसिलदार (वय 51) यांना करोनाची लागण झाली आहे. पुणे येथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ते पुणे येथे आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेले होते. तर तालुक्यातील शेडगाव येथील एका 40 वर्षीय महिलेचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. संगमनेरात शासकीय अधिकार्‍यास करोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे.

संगमनेर शहरासह तालुक्यात करोनाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण काही थांबत नाही. तालुक्याची करोना बाधीतांची संख्या 62 झाली आहे. तर अ‍ॅक्टीव्ह रुग्ण 34 झाले आहे.
लॉकडाऊनच्या काळात एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात जाण्या-येण्यास परवानगी देण्यासाठी नायब तहसिलदार यांच्यावर संगमनेर तहसिलमध्ये जबाबदारी देण्यात आली होती. बुधवार पर्यंत ते संगमनेर तहसिलमध्ये कार्यरत होते. त्यानंतर ते आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी पुण्याला गेले होते. तेथून आल्यानंतर त्यांना त्रास होवू लागला. रविवारी त्यांना घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. परंतु तेथून पुढील उपचारार्थ त्यांना पुणे येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना करोना सदृष्य लक्षणे दिसू लागल्याने वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांचा स्वॅब घेतला. तो तपासणीसाठी पाठविला. सदर स्वॅबचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला, अशी माहिती तहसिलदार अमोल निकम यांनी दिली. दरम्यान नायब तहसिलदार यांच्यावर पुणे येथेच उपचार सुरु आहे. तर ते संगमनेर येथे कार्यरत असलेल्या वेळेत त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात येणार आहे.

दरम्यान तालुक्यातील शेडगाव येथील एक 40 वर्षीय महिलेचा करोना पॉझिटिव्ह अहवाल स्थानिक प्रशासनास प्राप्त झाला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com