बेलापुरात पैशाची मागणी करत नियोजित लग्न मोडले
Featured

बेलापुरात पैशाची मागणी करत नियोजित लग्न मोडले

Sarvmat Digital

पाच जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील बेलापूर बुद्रुक येथे पैशाची मागणी करत नियोजित लग्न मोडल्याची घटना घडली.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात संबंधित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विलास घुले, विशाल घुले, विक्रम घुले, वैशाली घुले (सर्व रा. मांजरी बुद्रुक, जिल्हा पुणे) व अनिल पाटील (रा. हिरावाडी, जि. नाशिक) यांच्याविरुध्द गुरनं. 47/20 420 (34) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेलापूर बुद्रुक येथील एका मुलीचे विक्रम याच्याशी दि. 3 डिसेंबर 2019 रोजी नियोजित लग्न ठरले होते. मात्र वरील आरोपींनी संगनमत करून आणखी पैशाची मागणी करत लग्न मोडून मुलीची फसवणूक केली. त्यानुसार वरील आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास हेड कॉन्स्टेबल लोटके करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com