Wednesday, April 24, 2024
Homeनगरदिल्ली दरवाजा ते नेप्ती नाका रस्ता मृत्यूचा सापळा

दिल्ली दरवाजा ते नेप्ती नाका रस्ता मृत्यूचा सापळा

महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : मोकाट जनावरांचाही मुक्त संचार

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर शहरातील पहिला सिमेंट काँक्रिटचा रस्ता 2008 मध्ये दिल्ली दरवाजा ते नेप्ती नाका दरम्यान करण्यात आला. परंतु आता या रस्त्याची मोठी दुरवस्था झाला असून हा रस्ता आता मृत्यूचा सापळा बनला आहे. सिमेंट काँक्रिटच्या या रस्त्यामधील आता लोखंडी गज रस्त्यामधून बाहेर आले असून त्यामुळे वाहन चालकांना हे गज चुकवून प्रवास करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाचे दुर्लक्षामुळे नागरिकांना जीवमुठीत धरून या ठिकाणाहून प्रवास करावा लागत आहे.

- Advertisement -

शहरात 2008 मध्ये पहिल्यांदा सिमेंट काँक्रिटचा रस्ता करण्यात आला होता. पावसाळ्यात निलक्रांती चौक ते दिल्ली दरवाजा दरम्यान पावसाचे पाण्यामुळे तळे निर्माण होत असल्याने या रस्त्याच्या दरम्यान, मोठी गटार उभारून त्यानंतर दिल्ली दरवाजा ते नेप्ती नाका हा रस्ता सिमेंट काँक्रिटचा करण्यात आला होता.

बारावर्षांनंतर या रस्त्याची आता दयनीय अवस्था झाली आहे. जागोजागी मोठ-मोठे खड्डे पडले आहे. या रस्त्यामधील खडी, वाळू व सिमेंट आता गायब होत असून रस्ता तयार करताना वापरलेले स्टील म्हणजे लोखंडी गज उघडे पडले आहेत. एवढेच नाही तर काही ठिकाणी हे गज पूर्णपणे बाहेर पडले आहेत. त्यामुळे रस्त्याने चालताना हे गज पाहून आता चालावे लागत आहे. दिल्ली दरवाजा ते नेप्ती या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते.

मोठ्या वाहनांसह दुचाकी, तीनचाकी वाहने या रस्त्याने ये-जा करीत असल्याने सातत्याने या रस्त्यावर वाहनांची गर्दी दिसते. त्यात या नेप्ती नाका येथे अमरधाम असल्याने याच रस्त्यावरून अंत्ययात्रा देखील जात असतात. हा रस्ता सध्या तरी सावेडी व मध्यवर्ती शहरासह अन्य उपनगरांना जोडणार आहे.

त्यामुळे मोठी वर्दळ असतानाही या रस्त्याच्या दुरवस्थेकडे पाहण्यास महापालिका पदाधिकार्‍यांसह प्रशासनाला वेळ नाही. डोळ्याला पट्टी बांधल्यागत पदाधिकारी व अधिकारी काम करीत असल्याचे दिसत आहे. या रस्त्यावर मोकाट जनावरे देखील रस्त्याच्या मधोमध बसतात. अशावेळी वाहन चालकाला मार्ग काढावा लागतो. त्यात हे लोखंडी गज उघडे पडल्याने कधी काय होईल, हे सांगता येत नसल्याची आजची स्थिती आहे.

अवजड वाहनांचा मुक्त संचार
दिल्लीगेट आणि साताळकर हॉस्पिटलचा रोडवरून टिळक रस्त्याकडे जाणार्‍या रस्त्यावर मुक्तपणे अवजड वाहतुकीचा संचार आहे. गेल्या महिन्यात या रस्त्यावर डंपर खाली सापडून महिलेचा मृत्यू झाला होता. मात्र, त्यानंतर देखील अवजड वाहतूक पूर्णपण बंद झालेली नाही. वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या