Thursday, April 25, 2024
Homeनगरनेवासा – ओढ्यात आढळला तरुणाचा मृतदेह

नेवासा – ओढ्यात आढळला तरुणाचा मृतदेह

नेवासा बु. (वार्ताहर) – येथील मध्यमेश्वर बंधारा नजीक असलेल्या ओढ्यात आज सकाळी १० च्या सुमारास शहरातील गंगानगर परिसरातील हेमंत नंदकुमार कुसळकर (२०) या तरुणांचा पाण्यात फुगलेल्या अवस्थेत असलेला मृतदेह आढळला आहे.

त्याप्रकरणी सह्ययक पोलीस निरीक्षक विजय ठाकुर व पोलीस कॉन्स्टेबल संभाजी गर्जे व पोलीस हवालदार तुळशीराम गिते यांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला आहे. पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या