Thursday, April 25, 2024
Homeनगरदौंड-मनमाड महामार्गावरून दोन रेल्वे एक्सप्रेस सुरू; बेलापूर येथे थांबा

दौंड-मनमाड महामार्गावरून दोन रेल्वे एक्सप्रेस सुरू; बेलापूर येथे थांबा

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- करोना महामारीमुळे देशातील सर्वच रेल्वे गाड्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र चौथा लॉकडाऊन संपल्यानंतर काहीशी शिथिलता मिळाल्यानंतर रेल्वे मंत्र्यांनी काही रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. यात दौंड-मनमाड या रेल्वे महामार्गावरून पुणे-दानापूर पटणा एक्सपे्रेस व मडगाव ते हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस या दोन रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत, अशी माहिती बेलापूर रेल्वे स्टेशन प्रबंधक एल. पी. सिंग यांनी दिली.

करोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढू नये म्हणून रेल्वे प्रशासनाने भारतातील संपूर्ण रेल्वे प्रवासी वाहतूकच बंद केली होती. 02149 या क्रमांकाची पुणे-दानापूर ही रेल्वे पुणे येथून रात्री 8.55 वा. सुटते. बेलापूर रेल्वे स्थानकावर रात्री 12.45 वाजता पोहोचते तर ती पटणा येथे दुसर्‍या दिवशी पहाटे 3.45 वाजता पोहोचते. तसेच पटणा येथून 02150 या क्रमांकाची पटणा-पुणे ही गाडी रात्री 10.55 वा. निघते. ती बेलापूर येथे दुसर्‍या दिवशी रात्री 0.45वाजता पोहोचते ती पुणे येथे पहाटे 5.30 वाजता पोहचते.

- Advertisement -

तर दुसरी 02779 या क्रमांकाची मडगाव ते हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस ही रेल्वे मडगाव येथून दु. 3.45 वाजता सुटते पुणे येथे पहाटे 3.55 वाजता पोहोचते तर बेलापूर येथे सकाळी 8.30 वाजता पोहोचते. त्यानंतर ती हजरत निजामुद्दीन येथे तिसर्‍या दिवशी पहाटे 6.20 वा. पोहोचते. तिकडून निघणारी 02780 ही गोवा एक्सप्रेस हजरत निजामुद्दीन येथून दुपारी 3 वाजता निघून बेलापूर येथे दुसर्‍या दिवशी दु. 11.40 वा. पोहोचते. पुणे येथे संध्या. 4.20 वा. पोहोचते तर मडगाव येथे तिसर्‍या दिवशी पहाटे 5.40 वाजता पोहोचते.

सदरच्या दोन्ही रेल्वे गाड्या सुरू होऊन बेलापूर रेल्वे स्थानकात थांबणार असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, आरोग्य अधिकारी मुकूंद शिंदे, रेल्वेचे वाणिज्य प्रबंधक ए. जे. देशमुख यांनी रेल्वे स्टेशन येथे येवून पहाणी करून निरीक्षण केले व रेल्वे आल्यावर प्रवाशांकडून नियम कसे पाळले जातील तसेच रेल्वेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी नियम कसे पाळले पाहिजेत याबाबत चर्चा केली. बेलापूर येथून प्रवास करणारा प्रवासी रेल्वे येण्याच्या अगोदर एक तास स्टेशनवर हजर असणे आवश्यक आहे.

त्यानंतर त्याची आरोग्य अधिकार्‍यांमार्फत्त तपासणी केली जाईल. स्कॅनिंग करून आरपीएफचे अधिकारी त्याला प्लॅटफॉर्मवर डब्याच्या जवळ नेऊन सोडतील. येणारा प्रवासी प्लॅटफार्मवर उतरल्यानंतर त्याला वेटींग रुममध्ये आणून त्याची तपासणी करून त्याला क्वारंटाईन करण्याबाबत विचारविनिमय करतील.प्लॅटफार्मवर प्रवाशांव्यतिरिक्त कोणालाही सोडले जाणार नाही. याची काटेकोरपणे नियम पाळले जाणार असल्याचे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रणजित श्रीगोड, स्टेशन सल्लागार समितीचे बन्सी फेरवाणी यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या