अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा करोनाने मृत्यू ?; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
Featured

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा करोनाने मृत्यू ?; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Sarvmat Digital

दिल्ली – भारतातील मोस्ट वॉन्टेड डॉन दाऊद याला करोनाची लागण झाल्याची माहिती गुप्तहेर संघटनांनी दिली आहे. तसेच त्याच्या बायकोला देखील करोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. त्याचा करोनाने मृत्यू झाल्याच्या चर्चा सोशल मीडिया वर रंगू लागल्या आहेत.

दाऊद आणि त्याच्या बायकोचे करोना अहवाल पॉजिटिव्ह आल्यानंतर त्याचे अंगरक्षक आणि बाकी कामगारांना विलागिकरण कक्षात ठेवण्यात आल्याची माहिती देखील मिळत आहे. तसेच दाऊदचा काळाबाजार सांभाळणारा त्याचा भाऊ अनिस याने या बातमीला फेटाळले असून दाऊद बरा असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com