Thursday, April 25, 2024
Homeनगरकर्फ्यूतील बंदोबस्तासाठी जिल्ह्यात दोन हजार पोलीस

कर्फ्यूतील बंदोबस्तासाठी जिल्ह्यात दोन हजार पोलीस

पोलीस अधीक्षक सागर पाटील यांची माहिती : दर तासाला घेणारा आढावा

अहमदनगर (प्रतिनिधी) – कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश सुरू आहे. त्यातच पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात सुमारे दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. या बंदोबस्तात 200 पोलीस अधिकारी दिवसभर गस्त घालणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी दिली.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. जनतेनेच स्वतःच्या आरोग्यासाठी हा कर्फ्यू करून सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत घरात थांबायचे आहे. हा जनता कर्फ्यू यशस्वी होण्यासाठी पोलिसांनी देखील जिल्हाभर बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातील बंदोबस्ताचा आढावा शनिवारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी घेतला. जिल्ह्यात सुमारे दोन हजार पोलीस बंदोबस्त असणार आहेत. या बंदोबस्ताचे प्रतिनिधीत्व 200 पोलीस अधिकारी करणार आहेत.

हे अधिकारी दिवसभर स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत राहणार आहेत. त्याचा आढावा जिल्हा नियंत्रण शाखा दर तासाला घेणार आहे. या बंदोबस्तासाठी 17 शीघ्रकृती दल, चार आरसीपीची तुकडी, महिलांची पथक, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, गोपनीय पथक, मोबाईल सेल पथक, बिनतारी विभागाचे पथक तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या