दिल्ली – अधिकार्‍याला करोना, सीआरपीएफ मुख्यालय सील
Featured

दिल्ली – अधिकार्‍याला करोना, सीआरपीएफ मुख्यालय सील

Sarvmat Digital

दिल्ली – दिल्लीमधील केंद्रीय रिझर्व्ह पोलिस बलाचे (सीआरपीएफ) मुख्यालय बंद करण्यात आले आहे. सीआरपीएफ हेडक्वार्टरमधील एका अधिकार्‍याला करोनाची लागण झाल्याने मुख्यालय सील करण्यात आले आहे. तसेच 40 वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचार्‍यांना होम क्वारंटाईन करण्यात आलं असल्याची देखील माहिती आहे. एका अधिकार्‍याला करोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर रविवारी तातडीनं कार्यालय सील करण्यात आलं. दरम्यान, करोनाग्रस्त अधिकार्‍याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचं कामही सुरू करण्यात आलं आहे.

भारतातील सर्वात मोठं निमलष्करी दल सीआरपीएफची दिल्लीतील संपूर्ण इमारत सॅनिटाईझ केल्याशिवाय ही इमारत सुरु केली जाणार नाही. सीआरपीएफच्या जिल्हा निरीक्षक अधिकार्‍यांना वैद्यकीय नियमावलीनुसार प्रोटोकॉलचं पालन करण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीनं देण्यात आल्या आहेत. करोनाग्रस्त अधिकार्‍याच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेण्याचं कामही सुरू करण्यात आलं आहे.

Deshdoot
www.deshdoot.com