गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी दोघे ताब्यात
Featured

गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी दोघे ताब्यात

Sarvmat Digital

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर भागातील कारेगाव रोडवर दोन जणांकडे एक गावठी कट्टा मिळून आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सुनील देवराम पवार (रा. अशोकनगर) व अजित बबन आसने (रा. कारेगाव) यांच्याविरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम 3/7/25 प्रमाणे गुरनं 1002 दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील अशोकनगर भागातील कारेगाव रोड भागात दुचाकीवर असलेल्या दोघांकडे गावठी कट्टा व जिवंत काडतुस असल्याची गुप्त खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला असता वरील आरोपी गावठी कट्टा बाळगताना मिळून आले. त्यांच्याकडून गावठी कट्टा, एक जिवंत काडतुस व मोटारसायकल असा 1 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बहारकर करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com