अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल
Featured

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल

Sarvmat Digital

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी)– श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा फॅक्टरी या ठिकाणी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी दत्ता निवृत्ती शेलार याच्यावर श्रीगोंदे पोलीस ठाण्यात दि. 15 रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदे फॅक्टरी याठिकाणी एका अल्पवयीन मुलीला शेलार याने घराच्या पाठीमागे नेऊन बळजबरीने तिचे अंतर्वस्त्रे काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पीडितेने मोठ्याने आरडाओरडा केला .तिचा आवाज तिच्या आईने ऐकला आणि तिने आवाजाकडे धाव घेऊन पाहिले असता , शेलार याने पीडित अल्पवयीन मुलीच्या हाताला पकडून ठेवले होते.

मुलीने आईला पाहताच आईकडे धाव घेतल्याने आरोपीने घटनास्थळाहून पळ काढला. पीडित मुलगी बराच वेळ रडत होती. तिला काही वेळानंतर आई वडिलांनी विश्वासात घेऊन विचारणा केली असता, तिने आरोपी दत्ता निवृत्ती शेलार हा घराच्या मागे नेऊन माझी अंतर्वस्त्रे काढत होता, अशी माहिती दिली.

यानंतर आई वडिलांनी मुलीला घेऊन श्रीगोंदे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले. पीडितेच्या फिर्यादीवरून श्रीगोंदे पोलीस ठाण्यात विनयभंगासह बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण( पोस्को) नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आरोपी शेलार याला श्रीगोंदे पोलिसांनी अटक केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com