किरकोळ कारणावरून एकाला मारहाण
Featured

किरकोळ कारणावरून एकाला मारहाण

Sarvmat Digital

कोतवालीत पाच जणांवर गुन्हा

अहमदनगर (प्रतिनिधी) – प्रिंटींग केलेल्या फ्लेक्स बोर्डवरील चुकीचे नाव दुरूस्त करण्याच्या कारणावरून पाच जणांच्या टोळक्याने एकाला मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 7) साडेचारच्या सुमारास माळीवाड्यातील वसंत टेकडी जवळ घडली.

याप्रकरणी नागेश भिमाशंकर बिरदर, चेतन भिमाशंकर बिरदर, अजित सुर्यभान ठुबे, योगेश बबन चातुर, गणेश उत्तम भांबरे (सर्व रा. कडेगाव) यांच्याविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन तात्याराम प्रभुणे (रा. सारसनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी शुक्रवारी साडेचारच्या सुमारास वसंत टेकडी येथील त्यांच्या दिव्या प्रिंटींग प्रेस जवळ उभे होते. यावेळी आरोपी तेथे आले. फिर्यादी यांनी प्रिंटींग करून दिलेल्या फ्लेक्स बोर्डवरील नाव दुरूस्ती करून देण्याची मागणी आरोपी यांनी फिर्यादी यांच्याकडे केली.

यावरून फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये वाद झाले. या वादातून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करून चापटीने व लाथबुक्क्यांनी मारहाण केली. गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस नाईक गाडगे करत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com