शाळेच्या गेटसमोरच विद्यार्थिनीचा विनयभंग
Featured

शाळेच्या गेटसमोरच विद्यार्थिनीचा विनयभंग

Sarvmat Digital

श्रीरामपुरातील घटना : आरोपीविरुध्द गुन्हा दाखल

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- शहरातील वॉर्ड नं. 1 भागातील एज्युकेशन शाळेच्या गेट समोरून चाललेल्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडली. या प्रकारामुळे पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

याबाबत संबंधित विद्यार्थिनीने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पंकज राजू माचरेकर (रा. गोंधवणी) याच्याविरुध्द भादंवि कलम 354, बालकांचे लौंगिक अपराधापासून संरक्षण कायदा कलम 8, 12 प्रमाणे पोस्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुपारी 12 वाजेच्या सुमारास ही विद्यार्थिनी आपल्या मैत्रिणीसोबत शाळेत चालली होती. त्यावेळी शाळेच्या गेटसमोर असलेला आरोपी पंकज माचरेकर सदर विद्यार्थिनीस माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणाला. या मुलीने याकडे दुर्लक्ष करत ती पुढे निघाली असता आरोपीने तिचा हात पिरगाळून तिच्याशी लज्जा उत्पन्न होर्ईल, असे वर्तन केले. याबाबत सदर विद्यार्थीनीने दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि समाधान पाटील करीत आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक श्रीहरि बहिरट यांनी घटनास्थळी भेट दिली.

श्रीरामपुरात विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात ?
दोन दिवसांपूर्वी श्रीरामपूर शहरातच खासगी शिकवणीसाठी चाललेल्या एका मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र संबंधित मुलाच्या सतर्कतेमुळे अपहरणाचा प्रयत्न फसला. आता पुन्हा शाळेच्या गेटसमोरच शाळेत जाणार्‍या विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या दोन्ही घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे. तर कॉलेजरोड परिसरात फिरणार्‍या रोडरोमिओंचाही बंदोबस्त करणे गरजेचे आहे. शहरात घडणार्‍या अशा प्रकारांबद्दल पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com