या पोरीचा कोणी नाद करायचा नाय
Featured

या पोरीचा कोणी नाद करायचा नाय

Sarvmat Digital

आश्वीनजीकच्या तरुणावर गुन्हा

आश्वी (वार्ताहर)- संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर शिवारातील एका अल्पवयीन मुलीस करण अर्जुन सांगळे (रा. प्रतापपूर, ता. संगमनेर) याने भर रस्त्यात अपमानास्पद वागणूक दिल्याने त्याच्याविरुद्ध आश्वी पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीसह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअतंर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

पीडित मुलीने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सोमवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास मी शाळेतून घरी चालले होते. यावेळी करण सांगळे याने माझ्याजवळ येऊन नाव विचारले. परंतु मी पुढे घराकडे जाण्यासाठी निघाल्यानतंर एका भेळीच्या दुकानालगत बुलेट गाडी अडवून करण सांगळे हा माझ्याकडे पाहत मला हिच पाहिजे, या पोरीचा कोणी नाद करायचा नाय, असे म्हणून तुझ्याशीच लग्न करीन, असे म्हणाला. त्यामुळे मी घाबरून जोराने सायकल चालवू लागले. यावेळी एरिगेशन बंगल्याजवळ माझा वर्ग मित्र भेटल्यामुळे मी त्याला घडलेला प्रकार सांगितला. त्यामुळे त्याने करणला जाब विचारला असता त्याने ही पोरगी मला पाहिजे असे म्हणाला. घरी आल्यानतंर मी घडलेली सर्व हकीकत आई व वडीलांना सांगितली.

याबाबत सदर मुलीने आश्वी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन पोलिसांनी करण सांगळे यांच्या विरुद्ध आश्वी पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा व अ‍ॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत करत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com