संगमनेरात कत्तलीसाठी आणलेल्या 14 जनावरांची सुटका
Featured

संगमनेरात कत्तलीसाठी आणलेल्या 14 जनावरांची सुटका

Sarvmat Digital

संगमनेर (प्रतिनिधी)- शहरातील भारतनगर येथील परवेज कुरेशी याच्या वाड्यात कत्तलीच्या उद्देशाने आणलेल्या 14 जणावरांची सुटका पोलिसांनी केली आहे. याप्रकरणी एका जणाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कत्तलीच्या उद्देशाने जनावरे आणली असून ती भारतनगर येथील एका वाड्यात बांधलेली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश पंडीत यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात 8 बैल प्रत्येकी 15 हजार रुपये किंमतीप्रमाणे 1 लाख 20 हजार रुपये, 3 गायी प्रत्येकी 10 हजार रुपये किंमती प्रमाणे 30 हजार रुपये, लहान 3 वासरे प्रत्येकी 5 हजार रुपये किंमतीप्रमाणे 15 हजार रुपये असा एकूण 1 लाख 65 हजार रुपये किंमतीची जनावरे परवेज कुरेशी याच्या वाड्यात मिळून आली. ही जनावरे कत्तर करण्याच्या उद्देशाने निर्दयतेने दोरखंडाने बांधून ठेवलेली होती.

Deshdoot
www.deshdoot.com