Wednesday, April 24, 2024
Homeनगरमहामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकार्‍यांचे वेतनही दोन टप्प्यात

महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकार्‍यांचे वेतनही दोन टप्प्यात

अहमदनगर (प्रतिनिधी) – कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यासमोरील आव्हाने लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी तसेच शासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांचे मार्च महिन्याचे वेतन दोन टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात सर्व महामंळांचे पदाधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी व निवडून आलेले प्रतिनिधींचाही समावेश आहे. याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

राज्याच्या वित्त विभागाने आज जारी केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील अधिकारी-कर्मचार्‍यांना मार्च महिन्यासाठी देय वेतनाच्या 50 टक्के रक्कम पहिल्या टप्यात मिळेल. ‘क’ वर्गाच्या कर्मचार्‍यांना 75 टक्के वेतन पहिल्या टप्प्यात मिळेल. ‘ड’वर्गाच्या कर्मचार्‍यांच्या आणि सेवानिवृत्तीधारकांना पूर्ण वेतन मिळेल. या सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांच्या वेतनात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. या सर्वांचे उर्वरीत वेतन दुसर्‍या टप्प्यात देण्यात येणार आहे.

- Advertisement -

अस्थायी पदांना मुदतवाढ
राज्यातील सर्व अस्थायी पदांची मुदत दरवर्षी फेब्रुवारी अखेर संपुष्टात येते. अशा पदांचे वेतन आहरित करण्यापूर्वी 1 मार्च पासून अशा पदांना मुदतवाढ देण्याचे आदेश देण्यात येतात. सदर आदेशांद्वारे सर्व विभागांच्या अस्थायी पदांना 31 मे 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या