नगर – महापालिकेचा आजचा मेनू लापशी अन पुलाव…
Featured

नगर – महापालिकेचा आजचा मेनू लापशी अन पुलाव…

Sarvmat Digital

अहमदनगर – महापालिकेने स्वयंसेवी संस्था, सघटनांच्या सहकार्याने सुरू केलेल्या अन्नछत्रातून आज दि 14 रोजी लापशी आणि पुलाव देण्यात आला.

कल्याण रस्त्यावरील जाधव लॉन्स येथे सर्वांच्या सहकार्य तून स्वयंपाक केला जात आहे. काळ दि 13 रोजी पोळी आणि बटाटा भाजी हे मेनू होता, तो जवळपास 400 लोकांना देण्यात आला. आज लापशी आणि पुलाव याचे वाटप केले. सोशल डिस्टन्स नियम पाळून जाधव लॉन्स येथे सुमारे 400 गरजुनी याचे पॉकेट नेले. उपायुक्त सुनील पवार, प्रदीप पठारे यांच्या हस्ते त्याचे वाटप केले. तसेच महापालिकेने सात पथक तयार केले असून त्यांच्यामार्फत शहरात गरजवंता पर्यंत हे फूड पॉकेट पोहोचवले जात आहे. असे आज साडेतीनशे लोकांपर्यंत पाकिटे पोहोचविण्यात आली आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com