नगरी करोना वॉरियर्स मालेगावच्या मैदानात
Featured

नगरी करोना वॉरियर्स मालेगावच्या मैदानात

Sarvmat Digital

15 डॉक्टरांची तयारी । पाच जणांचे पथक रवाना

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगरी करोना वॉरियर्सनी मालेगावात करोना रोखण्याचे आव्हान स्विकारले आहे. नगरमधील 15 डॉक्टर मालेगावात सेवेसाठी जाणार असून त्यातील पाच जणांची टीम आज रवाना झाल्याची माहिती सिव्हील सर्जन डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली. तेथील आरोग्य यंत्रणेला ही टीम मदत करणार आहे.

मालेगाव येथे करोनाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे. तिथे करोनाच्या बाधित रुग्णाचा आकडा हजाराच्या जवळपास पोहचला आहे. त्यातच मालेगाव येथे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. मालेगाव येथे आरोग्य यंत्रणा कमी पडू नये म्हणून राज्य सरकार देखील काळजी घेत आहे. तेथील डॉक्टरांना मदत करण्यासाठी नगरचे 15 डॉक्टर जाणार आहे.

त्यातील 5 जणांची तुकडी मंगळवारीच मालेगावकडे रवाना झाली. त्यामुळे आता नगरच्या डॉक्टरांची मदत मालेगावकरांना मिळणार आहे. त्यामुळे प्रशासन यंत्रणेवर पडत असलेला ताण कमी होण्यास मदत होणार आहे. नगरच्या या यंत्रणेमुळे तेथील प्रशासनाला त्याचा फायदा होणार आहे. मालेगाव येथे 15 डॉक्टरांनी सेवा देण्याची देण्याची तयारी दर्शविली होती. त्यातील पाच जणांची टीम पहिली टीम रवाना झाली असल्याचे डॉ. मुरंबीकर यांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com