कोरोनाचा धसका; चोर्‍या, घरफोड्या रोखल्या
Featured

कोरोनाचा धसका; चोर्‍या, घरफोड्या रोखल्या

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी) – कोरोना व्हायरसने सर्वत्र धुमाकूळ घातला असल्याने चोरट्यांंनी याचा धसका घेतला असल्याचे चित्र आहे. गेल्या तीन ते चार महिन्यापासून जिल्ह्यात चोर्‍या, घरफोड्या, सोनसाखळी चोरी, चारचाकी, दुचाकी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहे.

यामध्ये गेल्या आठ दिवसापासून कमालची घट झाली आहे. यामुळे पोलिस प्रशासनावरील ताण कमी झाल आहे. परंतू, कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून लोकांना घरात थांबण्यासाठी पोलीस अहोरात्र मेहनत घेत आहे.

महाराष्ट्रात कोरोना हळूहळू पाय पसरत आहे. बांधित रूग्णांच्या संख्यत वाढ होत आहे. महाराष्ट्रात जमावबंदीचा आदेश जारी केला आहे. नागरिकांनी घराबाहेर न पडण्याच्या सुचना प्रशासनाकडून करण्यात आल्या आहे. नगर जिल्ह्यात प्रशासन आधिक सर्तक झाले आहे. नागरिकांनी घरात थांबण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहे.

लोक घरात, पोलीस रस्तावर असे एकंदरीत चित्र आहे. त्यात कोरोना सारखा गंभीर आजाराची लागण होऊ नये म्हणून चोरट्यांनी देखील घर न सोडल्याचा निर्णय घेतल्याचे एकंदरीत हे चित्र आहे.

नगर शहरात अलिकडच्या काळात सावेडी परिसर, कल्याणरोड परिसर, केडगाव, माळीवाडा, बालिकाश्रम परिसरात चोर्‍या, घरफोड्याच्या प्रमाणात वाढ झाली होती. दिवसा फ्लॅट फोडीच्या घटना घडल्या आहे. परंतू, लोकच घरात असल्याने चोरांना चोरीची संधीच मिळत नाही. लोक घरात, पोलीस रस्तावर त्यात कोरोनाचा धोका यामुळे चोरीच्या घटनामध्ये कमालीची घट झाली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com