सोनई – सोशल डिस्टनसिंग पाळत भाजीपाला विक्री
Featured

सोनई – सोशल डिस्टनसिंग पाळत भाजीपाला विक्री

Sarvmat Digital

सोनई (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील सोनई येथे विशिष्ट अंतर ठेवून भाजीपाला विक्री केली जात आहे. ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने शेतकरी व सोनई मधील नागरिकांची भाजीपाला ची सोय व्हावी म्हणून शेतकऱ्यांना पास दिले व ठराविक दिवशी ठरलेल्या वेळेत अंतर ठेऊन भाजीपाला विक्री करावी हे ठरवून दिले.

किंमती वाढू देऊ नये हा पण निर्णय घेण्यात आला आहे .तसेच रविवारी संपूर्ण बाजार बंद ठेवण्यात येईल व राहिलेल्या दिवसात सकाळी नऊ ते एक पर्यंत बाजार सुरू ठेवला जाणार असून त्याचा काल प्रारंभ झाला.

Deshdoot
www.deshdoot.com