अकोलेत सापडला दुसरा करोना ग्रस्त

अकोलेत सापडला दुसरा करोना ग्रस्त

अकोले (प्रतिनिधी) – अकोले तालुक्यात लिंगदेव पाठोपाठ ढोकरी येथेही एक करोना बाधित रुग्ण सापडला आहे.हे दोन्हीही रुग्ण मुबंई हुन अकोलेत आलेले आहेत.
लिंगदेव येथे गावी आलेल्या शिक्षकाचा खासगी प्रयोग शाळेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता,नंतर जिल्हा रुग्णालयात त्याचा स्वब घेऊन तो तपासनी साठी पाठविण्यात आला होता त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे.

मुबंई येथे नोकरीस असणारा तालुक्यातील ढोकरी येथील अभियंता शनिवारी अकोलेत आला होता. त्रास जाणवू लागण्याने तो ग्रामीण रुग्णालयात गेला,त्याला तपासणी साठी नगर येथे पाठविण्यात आले,त्याचा अहवाल ही आजच पॉझिटिव्ह आला आहे.त्यामुळे तालुक्यातील रुग्णाची संख्या आता दोन आली असून अकोलेकरांचे टेन्शन वाढले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com