Friday, April 26, 2024
Homeनगरमालुंजे : 11 संशयितांचे अहवाल निगेटिव्ह ; आश्वीच्या 22 क्वारंटाईन व्यक्तींना सोडले...

मालुंजे : 11 संशयितांचे अहवाल निगेटिव्ह ; आश्वीच्या 22 क्वारंटाईन व्यक्तींना सोडले घरी

आश्वी (वार्ताहर)- राज्य सरकारच्या मंत्रीमंडळातील एका जबाबदार मंत्र्याच्या संपर्कातील कोरोना बांधित रुग्णाच्या संपर्कात आलेली संशयित व्यक्ती संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथे नुकतीच आली होती. त्यामुळे या व्यक्तीची खबरदारी म्हणून जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आली असून ‘त्या’ सर्व 11 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर आश्वी येथे सापडलेल्या कोरोना बांधीत रुग्णाच्या संपर्कातील 22 जणांना संगमनेर येथे 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले होते. या 22 व्यक्तींना गुरुवारी आरोग्य विभागाने सुट्टी दिल्याने दिलासा मिळाला आहे.

दोन आठवड्यापूर्वी आश्वी बुद्रुक याठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याचे तपासणी अहवालातून उघड झाले होते. त्यामुळे या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 22 व्यक्तींना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले होते. या सर्व व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आल्यानतंर या 22 लोकांना संगमनेर येथील रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले. या संशयित व्यक्तींमध्ये कोणतीही लक्षणे आढळून न आल्याने 14 दिवसांनंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असून आश्वी बुद्रुक येथील राहत्या घरी होम क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

- Advertisement -

दरम्यान, राज्य सरकारच्या मंत्रीमंडळातील एका जबाबदार मंत्र्याच्या संपर्कातील कोरोना बांधित रुग्णाच्या संपर्कात आलेली व्यक्ती संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथे काही दिवसांपूर्वी आली होती. या व्यक्तीची व तिच्या संपर्कातील इतराची खबरदारी म्हणून जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आली. त्यामुळे या व्यक्तीच्या अहवालाकडे संगमनेर तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले होते. या व्यक्तीसह संपर्कातील अशा 11 व्यक्तीचा तपासणी अहवाल शुक्रवारी निगेटिव्ह आल्यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांसह प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.

दोन आठवड्यापूर्वी संगमनेर शहरात 3 तर आश्वी बुद्रुक याठिकाणी कोरोना बांधीत 1 रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग, महसूल व पोलीस प्रशासन हायअलर्ट झाले होते. कोरोना या संसर्गजन्य आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी आरोग्य विभाग, महसूल व पोलीस यत्रंणा डोळ्यात तेल घालून दिवस रात्र काम करत असल्याने कोरोना बांधिताचा आकडा वाढलेला नाही. तर आश्वी परिसरातील गावांवर डॉ. तय्यब तांबोळी, दीपक महाजन, विकास सोनवणे व पोलीस यंत्रणा लक्ष ठेवून असून कोरोना विषयी तयार झालेले दहशतीचे वातावरण हळूहळू निव्वळण्यास सुरवात झाली आहे. तर 3 मे पर्यत कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या