पाच अहवाल निगेटिव्ह
Featured

पाच अहवाल निगेटिव्ह

Sarvmat Digital

बाधीतांची संख्या सध्या स्थिर

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील करोना बाधीतांचा आकडा सध्या स्थिर असल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांत नव्याने बाधीत रुग्ण समोर न आल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने सुटकेचा निःश्वास टाकलेला आहे. दरम्यान, गुरूवारी प्रलंबित सहा व्यक्तींच्या अहवालापैकी 5 अहवाल जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झाले असून ते सर्व निगेटिव्ह असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी सांगितले.

जिल्ह्यात सध्या 8 करोनाबाधीत रुग्ण असून त्यांच्यावर नगरच्या बुथ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असून आतापर्यंत 1 हजार 505 व्यक्तींची करोनाची चाचणी करण्यात आली असून यात 44 व्यक्ती करोना बाधीत होते.

यातील दोघांचा मृत्यूू झालेला असून पुण्यात उपचारा दरम्यान एकाचा जीव गेलेला आहे. बुधवारी जिल्ह्यातील सहा करोना संशयीतांचे अहवाल घेवून ते पुण्याच्या लष्काराच्या प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात होते. यातील पाच व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com