38 अहवाल निगेटिव्ह !
Featured

38 अहवाल निगेटिव्ह !

Sarvmat Digital

जामखेड, नेवासा, पारनेर, संगमनेर , नगर, अकोलेतील व्यक्तींचा समावेश

आतापर्यंत 1 हजार 483 पैकी 1 हजार 395 अहवाल निगेटिव्ह

अहमदनगर (प्रतिनिधी)– जिल्ह्यातील करोना बाधीतांचा आकडा 40 वर पोहचला असला तरी त्यातील निम्म्यांहून अधिक रुग्ण करोनामुक्त झालेले आहेत. शुक्रवारी रात्री उशीरा पाठविलेल्या 41 संशयित करोना अहवालांपैकी 24 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात जामखेडच्या 16, नगर शहर आणि तालुका 5) संगमनेर आणि अकोले तालुक्यातील प्रत्येकी एक तर आष्टी तालुक्यातील एकाचा समावेश आहे. उर्वरित 17 अहवालांची अद्याप प्रतीक्षा असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेच्यावतीने सांगण्यात आले. तसेच शनिवारी रात्री आणखी 14 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यात आणखी जामखेड 6, पारनेर, नेवासा 2, नगर 2 आणि अकोले 1 यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात मार्च महिन्यांत करोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर जिल्हा प्रशासनाने राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आदेशानुसार जिल्ह्यात लॉकडाऊन केलेले आहे. यासह करोनाचा उद्रेक झाल्याने नगरमधील मुकूंदनगर, आलमगीर (ता. नगर), संगमनेर, नेवासा या ठिकाणी हॉटस्पॉट जाहीर केले असून त्या ठिकाणी अत्यावश्यक सेवा देखील सरकारी यंत्रणे मार्फत पुरविण्यात येत आाहे.

दरम्यान आतापर्यंत जिल्हा प्रशासनाने जिल्हा शासकीय रुग्णालयाच्यावतीने करोना संशयित 1 हजार 483 व्यक्तींच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पुण्याला पाठविलेले आहेत. यातील 1 हजार 381 अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. तर 40 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले असून उर्वरित अहवालांपैकी 24 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 17अहवालाची प्रतीक्षा असून काही अहवाल नाकारण्यात आले असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले.

जिल्हा रुग्णालयात 102 क्वारंटाईन
सध्या 690 व्यक्तींना त्याच्या घरातच क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्यावर पोलिसांची नजर आहे. तर 122 संशयितांना रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. त्याच सोबत जिल्हा सरकारी रुग्णालयात 102 व बूध हॉस्पिटलमध्ये 12 करोनाबाधीतांवर उपचार सुरू आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com