जिल्ह्यात सोमवारी 16 निगेटिव्ह
Featured

जिल्ह्यात सोमवारी 16 निगेटिव्ह

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा रुग्णालयाने पुणे येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या स्त्राव नमुन्यापैकी नेवासा एका व्यक्तीचा स्त्राव चाचणी अहवाल सोमवारी प्राप्त झाला. यात संबंधीत व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले असून 50 वर्षीय व्यक्ती हा नेवासे शहरातील आहे. दरम्यान, सोमवारी सायंकाळी उशीरा 16 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

जिल्हा रुग्णालयाच्या वतीने सोमवारी सकाळी 10 वाजेपर्यंत 1 हजार 123 व्यक्तींचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 1 हजार 16 व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव्ह आले असून 73 अहवालांची प्रतीक्षा होती. यातील 16 व्यक्तींचे अहवाल सोमवारी सायंकाळी निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित अहवालाची प्रतिक्षा आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 28 झाली आहे. यात बीड येथील आष्टी तालुक्यातील एक व्यक्ती, तसेच मुळचा श्रीरामपूर तालुक्यातील परंतू ससूनमध्ये उपचारादरम्यान मयत झालेला अशा दोन व्यक्तींचा समावेश आहे. सध्या वैदयकीय देखरेखीखाली 76 जणांना ठेवण्यात आले असून 449 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे तर 679 जणांना संस्थात्मक देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली.

Deshdoot
www.deshdoot.com