Friday, April 26, 2024
Homeनगरकोरोनाबाबत नागरिकांनी घाबरू नये, योग्य काळजी घ्यावी

कोरोनाबाबत नागरिकांनी घाबरू नये, योग्य काळजी घ्यावी

आमदार लहू कानडे यांचे नागरिकांना आवाहन; प्रशासकीय इमारतीत आढावा बैठक

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील शाळा, महाविद्यालयांबरोबर क्लासेस व ग्रामीण भागातील शाळाही बंद ठेवाव्या लागतील. याबाबत जिल्हाधिकार्‍यांशी बोललो आहे. याबाबत घाबरून न जाता प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी केले.

- Advertisement -

येथील नवीन प्रशासकीय इमारतमध्ये आयोजित ग्रामीण रुग्णालर, नगरपालिका तसेच ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्र केंद्रातील प्रमुख अधिकार्‍यांच्या बैठकीत ते बोलत होते. रावेळी आमदार कानडे रांनी अधिकार्‍यांशी चर्चा करुन त्रांना सूचना केल्रा. रावेळी प्रांताधिकारी अनिल पवार, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, तहसीलदार प्रशांत पाटील, तालुका पोलीस निरीक्षक मसूद खान, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे, पालिकचे उपमुख्राधिकारी प्रकाश जाधव आदींसह अन्य अधिकारी उपस्थित होते.

रावेळी आमदार कानडे म्हणाले की, शहरात कोरोना बाबत जनजागृती करण्यासाठी ठिकठिकाणी फलक लावले जाणार आहेत. त्याचबरोबर शासनाच्रा आदेशान्वये शहरी भागातील शाळा, महाविद्यालर, चित्रगृह, जलतरण तलाव, जीमही बंद ठेवण्रात आली आहेत. शहरातील शुक्रवारचा आठवडे बाजार बंद रहाणार आहे. तसेच तालुक्यातील ज्या गावांमध्ये आठवडे बाजार भरतात ते ही बंद ठेवण्यात आले आहे. झोपडपट्टी तसेच आर्थिक मागासलेल्रा परिसरात सानिटारझर देण्रात रेणार आहे. नागरिकांनी रा कोरोना विषाणूच्रा संसर्गाला घाबरुन जाऊ नरे. शासकीर पातळीवरती राबाबतच्रा खबरदारी घेण्रात आली आहे. प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीसखाते लक्ष देऊन आहेत. तरी कोणालाही कुठल्राही प्रकाची अडचण आल्रास संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

आपल्या मतदार संघामध्ये कोरोनाचा एकही संशयित नाही, ही समाधानाची बाब आहे. परंतु या पुढीलही काळात शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांनी योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी, प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे, सोशल मीडियावर अफवा पसरवू नयेत, असे आवाहन आमदार कानडे यांनी केले. याप्रसंगी नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हात धुवा मोहीम चौकाचौकात राबवावी
कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती रोखण्यासाठी शहरातील चौका-चौकात आणि ग्रामीण भागातील महत्त्वाच्या ठिकाणी हात धुवा मोहीम राबविण्याच्या सूचना आमदार लहू कानडे यांनी केल्या. त्यासाठी चौकाचौकात पाणी व साबण ठेवून लोकांमध्ये हात धुण्याबाबत प्रबोधन करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या