कोरोना : नगरच्या ‘त्या’ रुग्णाच्या घर, परिसरावर लक्ष केंद्रित
Featured

कोरोना : नगरच्या ‘त्या’ रुग्णाच्या घर, परिसरावर लक्ष केंद्रित

Sarvmat Digital

नगर – कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या निवास परिसर व काम करीत असलेल्या परिसरातील घरांवर आता लक्ष केंद्रित केले असून त्यासाठी आठ पथक नियुक्त केले असल्याची माहिती महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी दिली.

या घरातील कोणालाही लक्षणे आढळल्यास त्यांना उपचारासाठी रवाना करण्यात येणार आहे. पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेल्या रुग्णालयाच्या एरियात सुमारे अडीच हजार घरे आहेत. त्याठिकाणी फवारणी सुरू केली आहेच, पण त्यानंतर शहरात सर्वत्र फवारणी होणार. तसेच शहरात घरोघरी जाऊन तपासणी करण्याचाही विचार आहे, असेही ते म्हणाले. बेघरासांसाठी केलेल्या निवाऱ्यात सध्या क्षमता पेक्षा जास्त लोक असल्याचेही ते म्हणाले.

Deshdoot
www.deshdoot.com