दहा महिन्यांच्या बाळासह पाच रुग्णांची करोनावर मात
Featured

दहा महिन्यांच्या बाळासह पाच रुग्णांची करोनावर मात

Sarvmat Digital

95 रुग्ण करोनामुक्त : शुक्रवारी 61 अहवाल निगेटिव्ह

अहमदनगर (प्रतिनिधी) –  जिल्ह्यातील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करीत असलेल्या उपाय योजनांना यश आल्याचे चित्र दिसत आहे. शुक्रवारी 5 रुग्ण करोनामुक्त झाले. यात श्रीगोंदा फॅक्टरी येथील दहा महिन्यांच्या बाळासह इतर चार रुग्णांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 95 झाली आहे. यासह शुक्रवारी रात्री उशीरा 74 अहवालापैकी 61 अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले.

शुक्रवारी बूथ हॉस्पिटलमधून श्रीगोंदा फॅक्टरी दहा महिन्यांच्या बालकासह पिंपळगाव खांड (ता. अकोले) येथील 45 वर्षीय व्यक्ती आणि 18 वर्षीय युवती, नेवासा बु. येथील 24 वर्षीय युवकाला आज घरी सोडण्यात आले. तर, संगमनेर येथील 65 वर्षीय व्यक्तीही करोनामुक्त झाला आहे. मात्र, त्या रुग्णाला एक दिवस देखरेखीखली ठेवण्यात येणार असून सध्या हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात येणार असून आज त्याला घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसानंतर शुक्रवारीअखेर जिल्ह्यात करोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. शुक्रवारी दिवसभर 74 संशयितांचे अहवालाची प्रतिक्षा होती. त्यापैकी रात्री उशीरा 61 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 13 अहवालाची प्रतिक्षा आहे.

89 अ‍ॅक्टिव केसेस
जिल्ह्यात सध्या करोना बाधितांची संख्या 195 असून यातील 95 रुग्णांनी करोनामुक्त झाले असून यात मुंबईहून आलेल्या 22 रुग्णांचा समावेश आहे. बाधित 72 रुग्णांवर बुथ हॉस्पिटलमध्ये 7 रुग्णांवर जिल्हा रुग्णालयातील आयसीयुमध्ये 9 रुग्णावर लोणीच्या प्रवरा मेडिकल ट्रस्टमध्ये आणि एकावर संगमनेरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

त्या महिला डॉक्टरच्या अहवालावर चुप्पी
कोपरगावमधील एका महिला डॉक्टरचा खासगी प्रयोग शाळेतलल करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. मात्र, या अहलवालाबाबत जिल्हा आरोग्य यंत्रणा चुप्पी साधून आहेत. अशाच तिन खासगी प्रयोग शाळेतील संगमनेरच्या रुग्णांच्या अहवाल बाबत प्रशासनाकडून कोणताच खुलासा करण्यात आलेला नाही.

Deshdoot
www.deshdoot.com