कोरोनाग्रस्तांवर नगरमध्येच आता उपचार
Featured

कोरोनाग्रस्तांवर नगरमध्येच आता उपचार

Sarvmat Digital

जिल्हा रूग्णालयात 100 खाटा उपलब्ध

मुंबई- कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील 30 शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषित केली आहेत. या रुग्णालयांत केवळ कोरोना रुग्णांवर उपचार केले जातील. त्यासाठी अधिसूचना काढण्यात आली असून 2 हजार 305 खाटा कोरोनाबाधीतांच्या उपचारासाठी उपलब्ध झाल्या आहेत, त्यात अहमदनगर जिल्हा रूग्णालयात 100 खाटा उपलब्ध आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली आहे.

या अधिसूचनेमुळे या रुग्णालयांना संशयित आणि कोरोना निदान झालेल्या रुग्णांना केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार करणे बंधनकारक असणार आहे.

राज्य शासनामार्फत कोरोना प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. राज्यात चाचण्यांची सुविधा वाढवितानाच आवश्यकता भासल्यास रुग्णांवर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्ष करण्यात आले आहेत. मात्र कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये घोषीत करण्यात आली असून त्यासाठी आरोग्य संचालकांनी अधिसूचना काढली आहे, असेही आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com