आयपीएलच्या वेळापत्रकात बदल, 15 एप्रिलपासुन सामने सुरू
Featured

आयपीएलच्या वेळापत्रकात बदल, 15 एप्रिलपासुन सामने सुरू

Sarvmat Digital

दिल्ली –  बीसीसीआयच्या बैठकीत कोरोना व्हायरसमुळे आयपीएलची स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आधीच्या वेळापत्रकाप्रमाणे आयपीएल 29 मार्च रोजी सुरू होणार होती. मात्र आता ती 15 एप्रिल रोजी सुरू होणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या अधिकार्‍यांनी दिली आहे.

सर्व स्थरातून करोनाचा सामना करण्याचे आवाहन करण्यात येत असून अशा वातावरणात आयपीएल भरवणे धोक्याचे असल्याचे प्रतिक्रिया व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर आयपीएल पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची कल्पना सगळ्या संघांच्या मालकांना देण्यात आली आहे. केंद्र सरकारने बुधवारी सर्व व्हिसा 15 एप्रिल पर्यंत रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर दिल्लीमध्ये बीसीसीआयच्या अधिकार्‍यांची बैठक झाली आणि आयपीएल पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

Deshdoot
www.deshdoot.com