Thursday, April 25, 2024
Homeनगरइंडोनेशियाची व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह; संपर्कात आलेले 25 जण तपासणीसाठी नगरला

इंडोनेशियाची व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह; संपर्कात आलेले 25 जण तपासणीसाठी नगरला

कोल्हार 7, पाथरे बुदुक 4, हसनापूर 6, दाढ बुद्रुक 5 व लोणीतील 3 व्यक्तींचा समावेश

कोल्हार (वार्ताहर)- जिल्हा प्रशासन नियंत्रण कक्षाच्या ताब्यात तबलीक जमातीचा इंडोनेशियाचा एक व्यक्ती सापडल्याने त्याला तपासणीसाठी नेले असता तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. गेली दहा ते बारा दिवस कोल्हार, पाथरे बुद्रुक, हसनापूर, दाढ बु्रद्रुक व लोणी या ठिकाणी वास्तव्यास होता. त्याच्याशी संपर्कात आलेल्या 25 जणांंना जिल्हा प्रशासन नियंत्रण विभागाने ताब्यात घेतले असून त्या सर्वांना पोलीस बंदोबस्तात नगर येथे तपासणीसाठी पाठविले आले असल्याची माहिती कोल्हार येथील आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय घोलप यांनी दिली.

- Advertisement -

इंडोनेशियाच्या या व्यक्तीस जिल्हा प्रशासन नियंत्रण कक्षाने ताब्यात घेत त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठविले असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर जिल्हा प्रशासन नियंत्रण कक्षाने कोल्हार येथील आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय घोलप ग्रामपंचायतीस सदर इंडोनेशियाचा ही व्यक्ती या परिसरात कुठे कुठे व किती दिवस वास्तव्यास होता व त्याचा कोणा कोणाशी संपर्क आला याची तातडीने चौकशी करा असे सांगितले. त्यानुसार इंडोनेशिया येथील व्यक्ती कोल्हार येथे तबलिग जमातीच्या मशिदमध्ये 9 ते 10 मार्च दरम्यान वास्तव्यास होता. त्यानंतर तो पाथरे बु्रद्रुक, लोणी, हसनापूर, दाढ बुदुक येथे असे एकूण दहा ते बारा दिवस यापरिसरात वास्तव्यास होता.

त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, कोल्हार ग्रामपंचायत अधिकारी, पदाधिकारी यांनी संबंधित गावात जावून चौकशी केली असता कोल्हार येथील 7, पाथरे बुद्रुक येथील 4, हसनापूर येथील 6, दाढ बुदुक येथील 5 व लोणी येथील 3 अशा 25 व्यक्तींच्या संपर्कात आला होता. त्यानुसार त्यांनी या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांना तपासणीसाठी नगर येथील शासकीय रुग्णालयात काल रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास अ‍ॅम्ब्युलन्समधून पोलीस बंदोबस्तात नेण्यात आले आहेत. या सर्वांच्या तपासण्या करुन त्याचा रिपोर्ट 24 तासातच ताब्यात मिळणार असल्याचेही डॉ. घोलप यांनी सांगितले. त्यांचे रिपोर्ट आल्यानंतर या 25 व्यक्तींचा कोणा कोणाशी संपर्क आला होता. त्या सर्वांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचीही तपासणी करण्यात येणार असल्याचेही डॉ. घोलप यांनी सांगितले.

या कामी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय घोलप, त्यांचे वैद्यकीय पथक, लोणी पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, कोल्हारचे माजी सरपंच डॉ. सुरेंद्र खर्डे, पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे संचालक स्वप्नील निबे, ग्रामविकास अधिकारी, तलाठी, यांच्यासह मान्यवरांनी सहकार्य केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या