नगर – पहिला कोरोनामुक्त रुग्ण घराकडे रवाना
Featured

नगर – पहिला कोरोनामुक्त रुग्ण घराकडे रवाना

Sarvmat Digital

अहमदनगर ( प्रतिनिधी ) – शहरातील कोरोना विषाणूबाधित पहिला रुग्ण बरा होऊन आज रविवारी दुपारी बाराच्या सुमारास बूथ हॉस्पिटलमधून घराकडे रवाना करण्यात आला. यावेळेस आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्स आणि वॉर्ड बॉय यांनी टाळ्या वाजून त्याला रवाना केले. रुग्णांनी देखील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवेसाठी हात जोडून आभार मानले.

जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांचे आणि नियोजनाची देखील या रूग्णाने तोंड भरुन कौतुक केले. यावेळी हा रुग्ण काहीसा भावुक झाला होता.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1530901807059290&id=623727067776773

Deshdoot
www.deshdoot.com