Wednesday, April 24, 2024
Homeनगरसंगमनेरमधील पहिला रुग्ण करोनामुक्त; संजीवनीतून डिस्चार्ज

संगमनेरमधील पहिला रुग्ण करोनामुक्त; संजीवनीतून डिस्चार्ज

संगमनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील करोना विषाणूची बाधा झालेल्यांची संख्या 55 वर पोहचली आहे. त्यापैकी काही बरेही झाले. मात्र संगमनेरात स्थानिक प्रशासनाने करोनावर मात करण्यासाठी अधिगृहीत केलेल्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेला पहिला करोना बाधीत रुग्ण बरा झाल्याने त्यास आज डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी हॉस्पिटल प्रशासनाने प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या उपस्थितीत टाळ्या वाजवून त्यास निरोप दिला आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून विविध उपाय योजना करण्यात येत आहे. संभाव्य करोना बाधीतांसाठी प्रशासनाकडून शहरातील काही हॉस्पीटल अधिगृहीत करण्यात आली होती. त्यामध्ये संजीवन हॉस्पिटलचा समावेश आहे. या हॉस्पिटलमध्ये चार करोनाचे रुग्ण दाखल झाले होते. नगर येथे तपासणी करुन त्यांना अद्यावत अशा संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. संजीवन हॉस्पिटलचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश वाबळे, डॉ. सौ. एकता डेरे-वाबळे यांच्या नेतृत्वाखाली या रुग्णांवर उपचार सुरु होते.

- Advertisement -

दरम्यान काल गुरुवारी पहिला करोना बाधीत रुग्ण संजीवन हॉस्पिटलमधून बरा झाल्याने त्यास डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, डॉ. जगदीश वाबळे, डॉ. सौ. एकता डेरे-वाबळे, अ‍ॅड. श्रीराज डेरे यांच्यासह हॉस्पीटल कर्मचारी यांनी सदर व्यक्तीस टाळ्या वाजवून निरोप दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या