कोरोना – अफवा पसरविल्याप्रकरणी पुणतांब्यातील दोघांविरुध्द गुन्हा दाखल
Featured

कोरोना – अफवा पसरविल्याप्रकरणी पुणतांब्यातील दोघांविरुध्द गुन्हा दाखल

Sarvmat Digital

शिर्डी (प्रतिनिधी) – कोरोना व्हायरस या साथीच्या आजाराबाबत व्हाॅट्सअपव्दारे अफवा पसरवून जिल्हाधिका-यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी
पुणतांब्यातील दोघांविरुध्द राहाता पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहाता तालुक्यातील सुभाष वहाडणे व अविनाश चव्हाण यांनी 23 मार्च रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सुभाष भाऊ मित्रमंडळ नावाच्या व्हॅाट्सअप ग्रुपवरुन कोरोना व्हायरस या साथीच्या आजाराबाबत अफवा पसरवून जिल्हाधिका-यांच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com