कोरोनामुळे शेअर बाजार 3000 अंकानी घसरला
Featured

कोरोनामुळे शेअर बाजार 3000 अंकानी घसरला

Sarvmat Digital

दिल्ली – कोरोनाचा प्रभावामुळे जगभरातील शेअर बाजारामध्ये खळबळ उडाली आहे. त्याचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला आहे. बाजार सुरू होताच सेन्सेक्स 3,000 पेक्षा जास्त अंकांनी खाली आला तर निफ्टी सुमारे 750 अंकांनी खाली आला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला साथीची रोग घोषित केल्यानंतर जागतिक आर्थिक मंदीच्या भीतीमुळे जगभरातील शेअर बाजारामध्ये घट झाली आहे आणि देशांतर्गत बाजारावरही त्याचा अत्यंत नकारात्मक परिणाम झाला आहे.

गुरूवारी शेअर बाजार बंद होतांना अनेक गुंतवणूकदारांचे सुमारे 9 लाख करोड रुपये बुडाल्याची माहिती मिळते आहे. शेअर मार्केटच्या इतिहासातील सगळ्यात मोठी घसरण नोंदवली गेली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com