2 हजार 243 गुरूजींना ‘करोना’ ची ड्युटी

2 हजार 243 गुरूजींना ‘करोना’ ची ड्युटी

36 केंद्रप्रमुख तर 21 विस्तार अधिकार्‍यांचा समावेश

अहमदनगर (प्रतिनिधी)- करोना विषाणू संसर्गामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे सर्वत्र नाकाबंदी सुरू असून त्या ठिकाणी चेकपोस्ट तयार करण्यात आले आहेत. यासह पेट्रोलपंप, शेल्टर होम सुरू करण्यात आले असून त्याठिकाणी तपासणीसोबत तालुक्याच्या ठिकाणी कंट्रोल रुम तयार करण्यात आलेले आहे. याठिकाणी जिल्ह्यातील 2 हजार 243 प्राथमिक शिक्षकांची तपासणीसाठी नेमणूक करण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनाने करोना विरोधातील लढ्यात जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी या शिक्षकांच्या ड्युट्या लावण्यात आल्या आहेत. यात चेक पोस्ट, स्वस्त धान्य दुकानाची तपासणी, पेट्रोल पंप तपासणी, शेल्टर होमला भेट देऊन तपासणी, कंट्रोल रुममध्ये नेमणूक, आदी कामे आता प्राथमिक शिक्षकांना करावी लागणार आहेत. जिल्ह्यात सुमारे 12 हजार प्राथमिक शिक्षक कार्यरत असून त्यापैकी 2 हजार 243 प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यात श्रीरामपूर आणि कोपरगाव तालुक्यातील एकाचाही समावेश नाही.

तालुकानिहाय नेमणुका
अकोले 4 विस्तार अधिकारी, 2 केंद्र प्रमुख 142 शिक्षक यांच्याकडे चेक पोस्ट आणि धान्य दुकानाची जबाबदारी.
जामखेड 275 शिक्षक पेट्रोल पंप, रेशन दुकान आणि चेक पोस्टचे काम.
कर्जत 136 शिक्षक रेशन दुकानावर निरीक्षक.
नगर 3 विस्तार अधिकारी, 253 शिक्षक शल्टर होम, रेशन दुकान जबाबदारी.
नेवासा 1 विस्तार अधिकारी, 174 शिक्षक रेशन दुकान, करोना जनजागृती.
पारनेर 3 विस्तार अधिकारी 253 शिक्षक रेशन दुकान.
पाथर्डी 3 विस्तार अधिकारी, 7 केंद्रप्रमुख 351 शिक्षक रेशन दुकान आणि चेकपोस्टची जबाबदारी.
राहाता 1 विस्तार अधिकारी कंट्रोल रुम.
राहुरी 3 विस्तार अधिकारी, 3 केंद्रप्रमुख, 196 शिक्षक, शेल्टर होम, रेशन दुकान, कंट्रोल रुम.
संगमनेर 44 शिक्षक चेक पोस्ट.
शेवगाव 267 शिक्षक, रेशन दुकान, टोल नाका,आपत्ती कक्ष.
श्रीगोंदा 3 विस्तार अधिकारी, 24 केंद्र प्रमुख आणि 95 शिक्षक कंट्रोल रुम आणि चेक पोस्ट.
श्रीरामपूर आणि कोपरगाव निरंक.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com