Friday, April 26, 2024
Homeनगरकरोनाग्रस्त वृद्धाच्या मृत्यूमुळे राजूरमधील 6 जण क्वारंटाईन

करोनाग्रस्त वृद्धाच्या मृत्यूमुळे राजूरमधील 6 जण क्वारंटाईन

अकोले (प्रतिनिधी)- संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे करोनाचा विषाणूमुळे मृत्यू पावलेल्या वृद्धाच्या संपर्कात आल्यामुळे अकोले तालुक्याची धाकधूक वाढली आहे. अकोलेसह राजूर व कोतुळ येथील काही नागरिक धांदरफळ येथे अंत्यविधीस गेल्याची चर्चा तालुक्यात वार्‍या सारखी पसरली. यातील राजूर येथील ‘त्या’ सहा जणांना होम क्वांऱटाईन करुन अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले. तर अकोले व कोतुळ येथील त्या व्यक्तींना प्रशासनाने ताबडतोब होम क्वारटाइन करून त्यांची चौकशी करून तपासणी करण्याची मागणी केली आहे.

राजूर ग्रामपंचायतीने तहसीलदार मुकेश कांबळे यांना लेखी कळवुन संबंधितांना तपासणी करून होम कोरंटाईन करण्याची विनंती केली.तर खबरदारीचा उपाय म्हणून शनिवार ते सोमवार या तीन दिवस राजूर गाव बंद ठेवण्यात आले असून राजूर गावातील ज्या व्यक्ती धांदरफळ येथे अंत्यविधीसाठी गेले होते. त्यांनी स्वतःहून पुढे येऊन आपली माहिती द्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे व तीन दिवस सर्व व्यवहार बंद करून कुणीही घराबाहेर न पडु नका, तर संबंधितांनी पुढे येऊन विलगीकरण करुन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही सरपंच गणपतराव देशमुख यांनी केले आहे.

- Advertisement -

राजूर गावामध्येे स.पो.नितिन पाटील,सरपंच गणपतराव देशमुख ,उपसरपंच गोकुळ कानकाटेे, ग्रा.प.सदस्य भास्कराव येलमामे यांनी धांंदरफळला जाऊन आलेल्याचा शोध घेऊन करोणाच्या बाबतीत प्रबोधन करत माहिती दिली. राजूरमध्ये धांदरफळला जाऊन आलेल्या त्या सहा जणांना होम क्वांऱटाईन करण्यात आले आहेत..

धांदरफळ येथे करोना बधिताच्या अंत्यविधीला अकोले शहरातील काही व्यक्ती गेल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. अकोले तालुका करोना मुक्त राहण्यासाठी प्रशासनाने यात गांभीर्याने लक्ष घालून संबंधितांना ताब्यात घ्यावे अशो मागणी अकोलेचे माजी सरपंच संपतराव नाईकवाडी व माजी उपसरपंच दिलीप शहा यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या