कोपरगावच्या महिलेची कोरोनाशी झुंज अपयशी !

कोपरगावच्या महिलेची कोरोनाशी झुंज अपयशी !

अहमदनगर (प्रतिनिधी) – कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर भागात राहणारी महिला कोरोनाशी झुंज देत असताना अखेर मंगळवारी पहाटे तिने अखेरचा श्‍वास घेतला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी याबाबत माहिती दिली. यामुळे जिल्ह्यातील दोघांचा कोरोमुळे बळी गेला आहे. तर जिल्ह्यात उपचार घेणारी पहिली व्यक्ती मृत्यूमुखी पडली आहे.

मागील आठवड्यात श्रीरामपूर तालुक्यातील गोवर्धन येथील एका तरूणाला कोरोनामुळे जीव गमवावा लागला. आता या महिलेच्या मृत्यूमुळे जिल्ह्याची चिंता वाढली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 28 जणांना लागण झाली आहे. गेल्या शुक्रवारी कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर भागातील या 60 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली असल्याचे आढळून आले होते. त्या आधीच तिला ग्रामीण रुग्णालयात न्यूमोनियाची उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आल्यानंतर या महिलेस नगर येथील बूथ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी तिला जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज सकाळी महिलेचा मृत्यू झाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com