करोना रोखण्यासाठी आमदार निधी
Featured

करोना रोखण्यासाठी आमदार निधी

Sarvmat Digital

– बद्रीनारायण वढणे

नगर जिल्ह्यासाठी 2 कोटी 80 लाख

अहमदनगर- राज्यात करोनाविरोधात जोरदार लढाई सुरू असून आपत्कालीन परिस्थितीत जिल्हास्तरावर परिणामकारक प्रतिबंधात्मक कार्यवाहीसाठी खर्च भागविण्यासाठी आमदारांना प्रत्येकी 2020-2021 चा पहिला हप्ता 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार नगर जिल्ह्यातील चौदा आमदारांना 2 कोटी 80 लाख रुपये मिळणार आहेत. या निधीमुळे करोना विरोधातील लढ्याला आणखी बळ येईल.

आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत 2020-2021 या आर्थिक वर्षाकरिता 1101.00 कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. यापैकी प्रति 50.00लक्ष याप्रमाणे एकूण 366 विधिमंडळ सदस्यांना183 कोटी एवढा निधी मंजूर करण्यात येत असून त्यापैकी 288 विधानसभा सदस्य आणि 73 विधान परिषद सदस्यांना प्रति 20.00 लक्ष याप्रमाणे 72 कोटी 20 लाख रुपयांचा निधी सर्व संबंधित जिल्हाधिकार्‍यांच्या अधिनस्त ठेवण्यात येत आहे.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री शंकरराव गडाख, मंत्री प्राजक्त तनपुरे, आशुतोष काळे, बबनराव पाचपुते, रोहित पवार, संग्राम जगताप, मोनिका राजळे, लहू कानडे, निलेश लंके आणि डॉ. किरण लहामटे हे विधानसभा सदस्य आणि डॉ. सुधीर तांबे आणि अरुण जगताप हे विधान परिषद सदस्य यांचे प्रत्येकी 20 लाख रुपये याप्रमाणे एकूण 2 कोटी 80 लाखांचा निधी नगर जिल्ह्यातील करोनाला रोखण्यासाठी मिळणार आहे. त्यातून यंत्रसामग्री आणि अन्य साहित्य खरेदी करता येणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com