Thursday, April 25, 2024
Homeनगररूग्ण संख्या चिंताग्रस्त, स्वयंशिस्त पाळा, करोना टाळा

रूग्ण संख्या चिंताग्रस्त, स्वयंशिस्त पाळा, करोना टाळा

महसूल मंत्री ना. थोरात : परजिल्ह्यातून येणार्‍यांनी विलगीकरण कक्षात जावे

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत वाढणारी करोनाग्रस्त रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. ही रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि इतर यंत्रणा चांगल्या काम करीत आहेत. मात्र, नागरिकांनीही स्वयंशिस्त पाळणे आवश्यक आहे. बाहेरच्या जिल्ह्यातून येणार्‍या नागरिकांनी सक्तीने स्वत:ला विलगीकरण करुन घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने कार्यवाहीच्या सूचना राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला दिल्या.

- Advertisement -

जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात थोरात यांनी करोना उपाययोजनांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यावेळी उपस्थित होते.

ना. थोरात यांनी एकूण रुग्णांची संख्या, बरे झालेले रुग्ण, जिल्ह्यातील कोणत्या भागात रुग्ण वाढत आहेत आणि त्याची कारणे काय, बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना विलगीकरण करण्यासंदर्भातील कार्यवाही आदींची माहिती घेतली. मार्च आणि एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील रुग्णसंख्या रोखण्यात यशस्वी ठरलो. मात्र, त्यानंतर रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. ही रोखण्यासाठी कडक उपाय करावेत.

आगामी काळात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येकाने नियमांचे पालन करणे आणि आरोग्य यंत्रणेने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही करणे अपेक्षित असल्याचे सांगितले. जिल्ह्यात 12 मार्चला पहिला रुग्ण सापडला होता. मे आणि जून महिन्यात बाहेरुन येणारे नागरिक बाधित आढळण्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले. नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन ना. थोरात यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या