नगर – जिल्ह्यात ०९ नवीन रुग्ण
Featured

नगर – जिल्ह्यात ०९ नवीन रुग्ण

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर जिल्ह्यातील करोनाच्या ६० अहवालापैकी ५१ निगेटिव्ह तर ०९ पॉझिटिव्ह आले आहे. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता ११२ वर गेली आहे.

यात घाटकोपरहून अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथे आलेले ०१, ठाणे येथून पारनेर हिवरे कोरडा येथे आलेला १, चाकण (पुणे) येथून ढोर जळगाव शेवगाव येथे आलेला १, संगमनेर २, निमगाव (राहाता) ४ रुग्णांचा समावेश आहे. बाधीत रुग्णामध्ये ०४ पुरुष, ०४ महिला आणि ०४ वर्षीय लहान मुलीचा समावेश आहे.

निमगाव कोऱ्हाळेत आणखी ४ करोना पाॅझिटीव्ह

राहाता तालुक्यातील निमगाव कोऱ्हाळे या ठिकाणी भाजीपाला विक्रेती महिलेच्या घरातील चार जणाचे अहवाल पाॅझिटीव्ह आल्याने आता निमगाव कोऱ्हाळे येथील करोना पाॅझिटीव्ह संख्या पाच झाली आहे.

निमगाव कोऱ्हाळे येथील भाजीपाला विक्रेत्या महिलेस बुधवारी करोना पाॅझिटीव्ह असल्याचा अहवाल आला होता. यानंतर निमगाव कोऱ्हाळे व परिसरात खळबळ उडाली होती. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणेने तातडीने या महिलेच्या घरातील १५ जणांना नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठविले होते. त्यावेळी त्यांचे स्वॅब्चे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. १५ पैकी ११ जणाचे अहवाल निगेटीव्ह आले असून ४ जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत. या कुटुंबातील पती, एक मुलगा, एक सून, नात असे चार जणांना करोना असल्याची माहिती तहसिलदार कुंदन हिरे व वैद्यकीय अधिका-यांनी सांगितली.

Deshdoot
www.deshdoot.com