नगर – जिल्ह्यात आणखी ११ करोना बाधित
Featured

नगर – जिल्ह्यात आणखी ११ करोना बाधित

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात आणखी 11 करोना बाधित आढळले आहेत. मंगळवारी आलेल्या अहवालात हे बाधित समोर आले आहे. नगर शहर स्टेशन रोड परिसरातील ३३ वर्षीय महिला करोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अकोले तालुक्यात 6 रुग्ण आढळले असून त्यात जवळे येथील ४८ आणि २४ वर्षीय महिला आणि २८ वर्षीय पुरुष बाधित आहे. वाघापूर येथील ३२ आणि ४० वर्षीय महिला आणि ४५ वर्षीय पुरुष बाधित आहे. सर्व बाधित यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहेत.

संगमनेर तालुक्यातील डिग्रज व मालुंजा येथील २१ आणि ४५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना लागण झाली.

श्रीगोंदा तालुक्यातील कांडेगाव येथील ७५ वर्षीय महिला, राहाता तालुक्यातील लोणी येथील ५६ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे.

५ रुग्णांना डिस्चार्ज

मंगळवारी ५ रुग्ण करोनातून बरे होऊन घरी परतले आहे. जिल्ह्यात करोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ७८ झाली आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील १, संगमनेर येथील एक, मसने फाटा पारनेर येथील एक आणि नगर तालुक्यातील २ अशा एकूण पाच रुग्णांना बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com