Thursday, April 25, 2024
Homeनगरखोकला, श्वसन विकार, न्यूमोनिया, असणारे रुग्ण सिव्हीलला पाठवा

खोकला, श्वसन विकार, न्यूमोनिया, असणारे रुग्ण सिव्हीलला पाठवा

जिल्हाधिकार्‍यांचे खासगी डॉक्टरांना आदेश

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील सर्व खाजगी व्यवसायिक डॉक्टर यांना त्यांचे दवाखाना अथवा रुग्णालयात आलेल्या बाह्यरुग्ण व आंतरुग्णामध्ये खोखला, श्वसनाचा त्रास जाणवणारे ताप, घशात खवखव, धाप लागणे, न्यूमोनिया अशी लक्षणे असणारे रुग्ण यांना त्वरीत जिल्हा रुग्णालय नगर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत.

- Advertisement -

राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग अधिनियम 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3,4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे. त्याअन्वये जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोव्हीड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी घोषीत करण्यात आलेले आहे. त्यानुसार, हे आदेश जारी करण्यात आले.

यापूर्वीच, नगर जिल्ह्यातील सर्व खाजगी दवाखाने, सर्व रुग्णालये तसेच सर्व मेडीकल दुकाने त्यांचे दैनंदिन वेळेनुसार सुरु ठेवणेबाबत व आपत्कालीन परिस्थितीत खाजगी व्यवसायीक डॉक्टर यांनी दवाखाने बंद ठेवल्यास त्यांची नोंदणी रद्द करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे आदेश जारी करण्यात आले होते. केंद्र व राज्य शासनाने ज्यांना श्वसन विकाराचा तीव्र त्रास होत आहे, अशा नागरिकांचे सर्व्हेक्षण करणेबाबत निर्देश दिले आहेत.

त्यानुसार या रुग्णाची व्याख्या खालील प्रमाणे आहे. ज्या पाच वर्षांवरील सर्व व्यक्तींना आचानक सुरु झालेला 38 अंश सेल्सीयस ताप असेल, खोकला, घशात खवखव जाणवत असेल, धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता भासत असेल तसेच याशिवाय, ज्या 5 वर्षाखालील मुलांना न्यूमोनिया असेल आणि रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता भासत असेल अशा व्यक्तींना सारी (अचानक उद्भावणारा फुफसाचा आजार) रुग्ण म्हणून ओळखले जाते.

कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास ते साथ रोग अधिनियम 1897 मधे नमुद केलेनुसार भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये दंडनिय आणि कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या